१) प्रिंटर :- प्रशासकीय कामासाठी प्रिंटरची सुविधा नसल्याने अनेक अडचणी निर्माण होतात.त्यासाठी प्रिंटर कम झेरॉक्स आणि स्कॅनरची आवश्यकता अत्यंत निकडीची आहे.
२) ग्रंथालय कपाटे – अनेक दानशूर व्यक्तीकडून प्रशालेच्या वाचनासाठी पुस्तके उपलब्ध होतात, परंतु त्यासाठी आवश्यक कपाटे नसल्याने गैरसोय होते. म्हणून ग्रंथालयसाठी काचेच्या कपाटाची अत्यंत आवश्यकता आहे
३) टेलिफोन आणि इंटरनेट सुविधा – प्रशालेमध्ये संपर्क साधण्यासाठी टेलिफोनची आवश्यकता आहे. तसेच शालेय कामकाज ऑनलाइन झाले असल्या कारणाने इंटरनेट सुविधेची गरज आहे.
४) नेत्यांच्या प्रतिमा – थोर नेत्यांच्या जयंत्या ,पुण्यतिथी साजऱ्या करण्यासाठी प्रशाळेमध्ये नेत्यांच्या प्रतिमांची अत्यंत गरज आहे.
५) लाकडी खुर्च्या आणि टेबले – प्रशालेमध्ये लाकडी खुर्च्या आणि टेबलची खूप गरज आहे.
६) प्रोजेक्टर पडदा – प्रशालेमध्ये प्रोजेक्टर उपलब्ध आहे, परंतु त्यासाठी पडदा उपलब्ध नाही.
७) सुसज्ज प्रयोगशाळा – भावी शास्त्रज्ञ घडायचे असतील तर प्रशालेमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा असणे अत्यंत आवश्यक आहे, आमच्या प्रशालेला सुसज्ज प्रयोगशाळेची अत्यंत गरज आहे.
८) टेबलवरील काचा – शिक्षकांच्या टेबलवरील काचा आवश्यक आहेत.
९) प्रोजेक्टर साठी स्पीकर – प्रोजेक्टर प्रशालेमध्ये उपलब्ध आहे, परंतु त्यासाठी स्पीकर ची प्रशालेला गरज आहे.
१०) क्रीडासाहित्य – प्रशालेमध्ये क्रीडा साहित्य उपलब्ध आहे, परंतु अजूनही काही गोष्टींची प्रशालेला गरज आहे (डंबेल्स, झीम, मल्लखांब, व्हॉलीबॉल, फुटबॉल, कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल नेट, रस्सीखेच दोरी, उंचउडी स्टँड, इत्यादी)
११) शालेय स्पर्धेसाठी बक्षीसे – वर्षभरात विविध स्पर्धा प्रशालेमध्ये घेण्यात येतात परंतु त्यासाठी बक्षीस उपलब्ध नसतात. म्हणून बक्षीसांची गरज आहे. (दात्याच्या नावाने बक्षिसे देण्यात येतील).
१२) ग्रीनबोर्ड – वर्गांमध्ये ग्रीनबोर्डची गरज आहे.
१३) शैक्षणिक साहित्य – प्रशालेमध्ये दरवर्षी विविध शैक्षणिक साहित्याची आवश्यकता असते. (ऊदा. बॉक्स फाईल, साध्या फाईल, स्प्रिंग फाइल, खडू, डस्टर, व्हाईटबोर्ड मार्कर, फेविकोल, सेलो-टेप, स्टेपलेर पिन, इत्यादी साहित्य) याची गरज प्रशालेला दरवर्षी असते.