- संस्थेचे अध्यक्ष
![krutadnyata02-trans](https://pavnadevischool.in/marathi/wp-content/uploads/2020/05/krutadnyata02-trans.png)
![krutadnyata01-trans](https://pavnadevischool.in/marathi/wp-content/uploads/2020/05/krutadnyata01-trans.png)
नमस्कार वाचकहो –
कोकणातील देवगड तालुक्यातील बापर्डे नावाच्या एका छोट्या खेडेगावचे आम्ही ग्रामस्थ आणि मुंबईकर !
मुंबई पासून पार ५०० कि.मी. लांब असलेल्या या आमच्या खेडेगावात आम्ही शिक्षणाचा छोटा प्रयोग करीत आहोत त्याची ओळख करून देण्याचा हा आमचा प्रयत्न-
१. आमच्या काही मुंबईकर व ग्रामस्थ सहकाऱ्यांनी गावात राहणाऱ्या गरीब शेतकरी व शेत-मजुरांच्या मुलांसाठी (जी घरच्या काही अडचणीमुळे प्राथमिक शाळेनंतर पुर्ण शिक्षणालाच रामराम ठोकतात, त्यांच्यासाठी) या बापर्डे खेडेगावात एक हायस्कूल उभे केले आहे.
२. आपल्या सारख्या शिक्षणप्रेमींच्या सहभागाने रु. ५० लाख लोक-वर्गणी जमा करून, स्वतःच्या मालकीच्या अडीच एकर भूखंडावर १२ वर्ग खोल्यांसह, प्रयोगशाळा, वाचनालय, संगणक कक्ष सारख्या सोयींनी युक्त सुसज्ज अशी इमारत उभी केली आहे.
३. गेली ११ वर्षे कोणतेही सरकारी अनुदान न मिळताही, आर्थिक मदतीशिवाय, केवळ लोक-वर्गणीतूनच आम्ही इयत्ता ८ वी ते १० चे वर्ग चालविले आहेत.शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून आमच्या शाळेला महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन ) अधिनियम ,२०१२ अंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर शाळा सुरु करण्याची मान्यता मिळाल्याने आम्ही इया शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ६ वी ते १२ वी (वाणिज्य व विद्यान शाखा ) सुरु करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय करत आहोत.त्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतीही फी आकारली जात नाही.
४.११ वर्षांच्या कालावधीत शालांत परीक्षेला आमच्या शाळेच्या ९ तुकड्या बसल्या, ९ पैकी पाच वर्षे आमचा निकाल १०० टक्के पास असा आहे. त्या शिवाय जवळपास सर्वच मुले पहिल्या किवा दुसऱ्या श्रेणीत उत्तीर्ण झाली आहेत. काही विद्यार्थी ९०-९५ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. यात खास नमूद करण्याची गोष्ट ही आहे की, आमचे पुर्ण खेडेगाव आहे, तिथे खाजगी शिकवण्या / कोचिंग क्लास नाहीत किवा इंटरनेट नाही. हे सर्व श्रम पुर्णत: विद्यार्थी व शिक्षकांचे आहेत.
५. श्रीदेवी पावणादेवी कृ. शि. वि. मंडळ – धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी झालेली (registered) संस्था आहे. त्याचे सर्व हिशेब त्यांना रीतसर सादर केले जातात.
६. अर्थात आम्हाला उपकृत करणाऱ्या दात्यांचा इथे उल्लेख करायलाच हवा- आप्पा देऊ घाडीगांवकर यांनी मोक्याची २।। एकर जागा दिली, धोंडबाराव यशवंतराव राणे यांनी १५ लाख रुपये, डॉ. सुहास राणे यांनी १६.५ लाख रुपये आणि इन्फोसिस फाऊंडेशनने १० लाख रुपये तसेच मुंबईकर व ग्रामस्थांनी पाच हजारांपासून लाख-दोन लाखांपर्यंतच्या देणग्या दिलेल्या आहेत.
याखेरीज मुंबईच्या जसलोक रुग्णालयाचे नामवंत डॉक्टर्स, Indo-German Training Centre, Fuchs India, S.P. Jain Centre of Global Management इ. नामांकित कंपन्यांनी CSR कार्यक्रमा-अन्तर्गत आम्हाला आर्थिक सहाय्य पुरविले आहे. काही जणानी वैयक्तिक रीत्या आमचे विद्यार्थी दत्तक घेउन त्यांच्या शिक्षणाचा काहीसा भार उचलला आहे.
आमच्या या उपक्रमाबद्दल आपणास आणखी जाणून घ्यायचे असेल तर पुढील पाने वाचा आणि त्यानंतर जर आपणास आमच्या या ज्ञानयज्ञात सहभागी व्हायची इच्छा असेल, तर आमच्याशी जरुर संपर्क साधा.
धन्यवाद !
डॉ. सुहास राणे
इमेल : ranesuhas@hotmail.com
.
या संकेतस्थळाचे प्रायोजक – श्री. अनिल सप्रे (वास्तव्य ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका), आभार !