मुंबईस्थित वास्तव्यास असलेल्या मंडळींनी मूळगावच्या संपर्कात असावे, तसेच मुंबईत देखील आपापसात संपर्कात राहून समाजासाठी काही विकासकार्य करावे या उद्देशाने ह्या मंडळाची मुंबईत १२ ऑक्टोबर १९८६ विजयादशमी दिनी स्थापना झाली.
सर्वप्रथम मूळगावी आवश्यक त्या सुधारणा करण्याचे ठरवून राणेवाडीतील सर्व पाऊलवाटा चिरे लावून जाण्यायेण्या साठी सुखकर केल्या, त्यावर दिवे लावले, वाडीमध्ये, मोकळा परिसर श्रमदानाने स्वच्छ केला, वाडीतील कूळाचाराचे मंदीर सुशोभित केले, गावाच्या पारंपारिक सणांसाठी मुंबईकर आवर्जून जाऊ लागले. प्रामुख्याने गुढीपाडवा, होळी, दसरा, गणपती या सणाना सर्व चाकरमानी गावाकडे आकर्षित होऊ लागले.
गावी राणे समाजातर्फे १९९६ पासून सातत्याने माघी गणेशजयंती ऊत्सव दुर्गादेवी परिसरात भव्य प्रमाणात साजरा होतो. त्यासाठी सर्व बापर्डे पंचक्रोशीबरोबरच मुबंई, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, देवगड येथील भक्त परिवार उपस्थित असतात.
२o१३-१४ साली सहयोग मंडळाच्या पुढाकाराने राणे समाजाने, पाहुणे व मित्र मंडळी, देणगीदार यांच्या सहकार्याने श्री अमृतदादा राणे यांच्या नेतृत्वाखाली, श्री दुर्गादेवी, श्री रामेश्वर व पुर्व तळखंबा अशा तीनही मंदिरांचे भव्यदिव्य नूतनीकरण केले. याकामी सव्वा करोड रुपये खर्च करून अतिशय सुंदर मंदिरे व परिसर निर्माण केला. महाबळेश्वर व कर्नाटकच्या ब्रम्हवृंदाकरवी मोठे धार्मिक कार्यक्रम करुन सर्व मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व पुनर्स्थापना केली.
हळू हळू मंडळाने कार्यक्षेत्रात वाढ केली आहे व गावातील विविध समाज-उपयोगी कार्यक्रमात आम्ही सहभागी होऊ लागलो आहोत. प्रामुख्याने श्री पावणा देवी शिक्षण विकास मंडळ प्रायोजित कै. यशवंतराव राणे माध्यमिक शाळेला स्वत: लाखो रुपये देणग्या दिल्या, तसेच इतरांकडूनही मोठमोठया देणग्या मिळवून देण्याचे कार्य सहयोग सभासदांनी केले आहे. यामधे सहयोगचे संस्थापक – मार्गदर्शक डॉ. सुहास राणे यानी विविध संस्थाना पुढीलप्रमाणॆ देणग्या मिळवून दिल्या आहेत. त्याचा विशेश उल्लेख करावा लागेल –
- बापर्डे केंद्र शाळा – रु. १ लाख
- मोंड हायस्कुल – रु. ४ लाख
- देवगड कॉलेज – रु. १० लाख
- पावणादेवी हायस्कूल – रु १० लाख.
(याखेरीज त्यानी स्वताची १५ लाख रु देणगी पावणादेवी हायस्कूलच्या नियोजित सभागृहासाठी दिलेली आहे).
गावच्या शैक्षणिक व सामाजिक विकासकार्यात सहयोग-राणेवाडी मंडळ नेहमीच विविध कार्यक्रम स्वतःच्या पुढाकाराने घेत असते : शैक्षणिक शिबीर, मुलांचे गुणगौरव, मेडिकल कॅम्प, विविध स्पर्धा, तसेच कै. अमृतराव राणे यांच्या स्मृती दिना निमित्त विविध कार्यक्रम आयोजन इत्यादी.
आता श्री सुरेशराव राणे यान्च्या पुढाकाराने सहयोग चॅरिटेबल सेवा ट्रस्ट ही नोंदणीकृत स्ंस्थेची आम्ही स्थापना केली असून, या ट्रस्टच्या माध्यमातूनही इतर लोकोपयोगी कामे हाती घेत आहोत.
श्री. बाबुराव वामन राणे – अध्यक्ष : मो. 9869832773
श्री. मनोज जयवंत राणे – सचिव : मो. 9833888163