चालू घडामोडी
  • शालेय मंत्रीमंडळ निवडणूक 3 जुलै 2024 रोजी निवडणूक आयोग पद्धतीने घेण्यात येणार आहे .

नाईकधुरे विकास मंडळ, मुंबई – बापर्डे

प्रत्येक कोकणी माणसाला आपले स्वत:चे असे गाव असतेच. तो कुठ्ल्याही कर्मभुमीत असला तरी त्याच्या आठवणी जन्मभुमीच्या गावाशी जोडलेल्या असतातच !

नागमोडी रस्त्याच्या वळणावर, दरीच्या कुशीत बसलेली साठ-सत्तर घरांची आमची नाईकधुरे वाडी ! कोकणची लालमाती, प्रत्येकांची भातशेती, नारळी-फोफळीच्या बागा, आंब्याची वनराई आणि वळणदार नदी. या सगळ्यांची रेलचेल नयनरम्य व अति सुंदर अशा कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील निसर्गरम्य बापर्डे गाव !

गावातील आपली जमीन-जागा आणि घरदार सांभाळण्यासाठी चार भावापैकी एक भाऊ मुंबईत नोकरीत स्थिरावला व चाकरमानी झाला. परंतु त्याने आपली गावची नाळ जुळण्यासाठी तेथील सुधारणा करण्याचा चंग बांधला. चार-पाच, पाच-दहा असे एकत्र होत मुंबईत सर्वानी आपल्या भावकीचे एक मंडळ सन १९९०मध्ये स्थापन केले – तेच हे नाईकधुरे विकास मंडळ, मुंबई – बापर्डे !

गावात ज्या काही नविन सुधारणा करायच्या असतील त्यावर चर्चा होते, आणि सर्वांच्या संमतीने निर्णय घेऊन गावाच्या सुधारणा करण्यासाठी उत्साही राहतात. गावातील शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणास प्रथम प्राधान्य दिले जाते. तेथील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषके देऊन गौरविले जाते. त्यांच्या शिक्षणात काही अडचणी आल्यास सोडविण्यास आम्ही प्रयत्नशिल राहतो. शाळेची देखभालीसोबत, मुलांच्या शिक्षणावर लक्ष देण्या्साठी शिक्षकांशी संवाद साधला जातो. यामधे ग्रामस्थांचाही मोठा हातभार राहतो.

गावच्या शाळेसाठी ग्रामस्थांनी जमिनी दिल्या. गावातील आरोग्याबाबत एखाद्याला तातडीने मुंबईची गरज लागल्यास धावपळ करून त्यांना शक्य तितकी मदत करतात. गावातील पायवाटा, रस्ते याची पडझड पाहून ग्रामपंचायत यांच्याकडे समस्याचा पाठपुरावा केला जातो. गावातील देव-देवतांची मंदिर, त्यांच्या पायवाटा सुंदर दिसतील त्याकडे लक्ष देऊन त्या सुशोभित केल्या जातात, त्यासाठी देणग्या उभ्या केल्या जातात. ऊन्हाळ्याची सुरूवात होताच गावी पाण्याच्या समस्या चालु होतात यासाठी कायमस्वरूपी जल-योजना आखून प्रत्येक कुटुंबाला पाणी देण्याची योजना आम्ही साकारत आहोत.

देवदेवतांच्या जत्रा आल्या की ग्रामस्थांसह चाकरमानी उत्साहाने याला उत्साहाचे स्वरूप देऊन आलेल्या भक्त मंडळींना प्रफुल्लीत करतात. आमच्या नाईक-धुरे विकास मंडळातर्फे दरवर्शी श्री ब्राम्हणदेव उत्सव १५ फेब्रुवारी या दिनी भव्य प्रमाणावर साजरा केला जातो.

मुंबईमधील सभासदाच्या मुलांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील कला गुणांचा गुणगौरव, महिलांसाठी हळदीकुंकू, मुलांसाठी करीअर मार्गदर्शन त्यांच्या आरोग्याविषयी काळजीपुर्वक विचारणा या सर्व गोष्टींसाठी मुंबईचे चाकरमानी कार्यतत्पर राहून करत असतात. आमच्यापरीने अशी ही छोटीशी समाजसेवा आम्ही करीत असतो आणि यापुढे करीत राहू.

श्री. संजय नाईक-धुरे – अध्यक्ष
श्री. दिनेश बा. नाईक-धुरे – सरचिटणीस : मो. ९८६९२ २५२०६

यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय | 2024 © सर्व अधिकार राखीव