चालू घडामोडी
  • शालेय मंत्रीमंडळ निवडणूक 3 जुलै 2024 रोजी निवडणूक आयोग पद्धतीने घेण्यात येणार आहे .

अभिवादन

. घाडीगावकर बंधूनी  गावात मध्यवर्ती ठिकाणी असलेली स्वत:ची अडीज एकर जागा संस्थेला विनामूल्य दिली. कृतज्ञतापूर्वक संस्थेने या जागेचे नाम:करण “अप्पा देवू घाडीगावकर विद्यानगरी” असे केले आहे.

. गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ श्री धोन्डबाराव य. राणे यानी सुरुवातीच्या काळात अत्यावशक असणारी रु. १५ लाख देणगी दिल्यामुळे  इमारत कार्याचा शुभारंभ  करता आला. यास्तव संस्थेने कृतज्ञतापूर्वक त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ शाळेचे नाम:करण “यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय” असे केले आहे.

. शाळेची इमारत भव्य आणि प्रशस्त असावी या साठी डॉ. सुहास राणे यानी विशेष प्रयत्न केल्याने, बंगळूरूच्या  प्रख्यात इन्फोसिस फाउन्डेशनच्या अध्यक्षा सौ. सुधा मुर्ती यानी रु. १० लक्ष देणगी प्रदान केली. तसेच अनेक मान्यवर मुंबईकर व ग्रामस्थांनी सढळ हस्ते लाखालाखाच्या देणग्या दिल्या, कृतज्ञतापूर्वक त्यांची वर्ग खोल्याना व प्रवेशद्वारावर लावण्यात आलेली आहेत.

. या संस्थेची तसेच हायस्कूल परिसराची उभारणी केवळ संस्थापक–अध्यक्ष कै. दादासाहेब राणे यांच्या अथक प्रयत्नामुळेच शक्य झाली.

या सर्वाना विनम्र अभिवादन !

यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय | 2024 © सर्व अधिकार राखीव