आपणास आमच्या हायस्कूलसंबंधी आणखी काही माहीती हवी असेल किवा आमच्या विद्यार्थ्यांना आपणास दत्तक घ्यावयाची इच्छा असेल तर आमच्यापैकी पुढील कोणाशीही संपर्क करा –
तसेच आपण आमच्या या हायस्कूलला भेट देण्यासाठीही जरूर यावे ही विनंती !
जर आपण आधी कळविलेत तर आपली जाण्या-येण्याची व रहाण्याची व्यवस्था आम्ही चांगल्या प्रकारे करू शकू
आमचा पत्ता :
यशवंतराव राणे हायस्कूल
घाडीगावकर विद्यानगरी,
मु. पो. बापर्डे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग, महाराष्ट्र राज्य
Our address :
Yashwantrao Rane High-school
At & Post : Baparde, Tal. Devgad, Dist. Sindhudurg
Maharashtra State
मुंबई संपर्क : श्री विजय गुरव :- मोबाइल – ९३२२२ २३५८८ , इमेल – vijaygurav106@gmail.com
श्री. प्रसाद नाईक-धुरे :- मोबाइल – ८८७९७ ४०१५९ , इमेल – prasad_dhure@rediffmail.com
श्री बाबुराव राणे :- 98698 32773/ 99698 933377
बापर्डे संपर्क : मुख्याध्यापक, श्री अनिल गुरव :- मोबाइल – ०८६६९५ १३८५६
लिपिक, श्री प्रशांत घाडी :- मोबाइल – ०७५०७४ ३५५९१
मुंबई – गोवा रोड >> पुढे तळेरे पासून १ किमी कासर्डे >> तेथून विजयदुर्ग फाटा >> पुढे रेडेटाका >> नंतर पुढे - १ किमी बापर्डे (RATC)
बापर्डे हे गाव मुंबईहुन सुमारे 450 किलोमीटर दूर असून येथे कोकण रेल्वेने किवा मुंबई-गोवा महामार्गाने पोहोचता येते.
मुंबईहुन रेल्वेने पोहोचण्यासाठी वैभववाडी किंवा कणकवली या दोनपैकी कोणत्याही एका रेल्वे स्टेशनवर उतरावे. तेथून ४०-४५ कि.मी. अन्तरावर आमच्या गावी गाडीने किवा रिक्षाने येऊ शकता (एक/दीड तासाच्या अंतरावर आहे). किवा आम्हास आधी कळवल्यास आपल्याला तेथून पिकअप किवा ड्रॉप ची सुविधा RATC कडून दिली जाते. परंतु आमचे बरेचसे पर्यटक स्वतःच्या कार किंवा बस घेऊन येतात. पार्किंग सुविधा मुबलक उपलब्ध आहे.
![photo-pohochal-01](https://pavnadevischool.in/marathi/wp-content/uploads/2020/07/photo-pohochal-01.jpg)
आमच्या गावी येणारी किवा हायस्कूलला भेट देणारी पाहुणे मंडळी, तसेच ग्रामपंचायत कार्यालयाला भेटी देणारे शासकीय अधिकारी इत्यादी सर्वांची राहण्यासाठी सोय व्हावी या उद्देशाने आमचे एक सहकारी, आणि माजी सैनिक श्री बाबुराव राणे यानी रामेश्वर ऍग्रो टुरिझम केंद्र RATC स्थापन केले आहे. रेडे-टाका नावाच्या नाक्यावरून डावीकडे वळण घेतल्यावर बापर्डे गावात शिरल्यानन्तर (एक कि.मी अन्तरावर), एका डोन्गर-माथ्यावर हा दोन एकर जमिनीचा परीसर विकसित केलेला आहे.
RATC मधील सोयी : आंबा-काजूनी वेढलेल्या बागेमधे पर्यटकांना राहण्यासाठी चार खोल्या, स्वैपाक-घर, जेवणासाठी हॉल, पाण्याची व्यवस्था, याबरोबरच पोहोण्यासाठी तरण-तलाव, मुलांना खेळण्यासाठी मोकळी जागा, कार्यक्रमांसाठी व्यासपीठ (स्टेज) आहे. भक्तगणांसाठी छोटे श्री साई मंदिर बांधलेले आहे.
शहरात जन्मलेल्या आणि वाढलेल्या मुलांना गावाची ओळख करून देण्यासाठी येथे गाईंचा गोठा (गौशाळा) आहे. येथे गाईंचे संगोपन होते, गोबर गॅस प्लॅन्ट साठी लागणारे शेण, शेणखत, गोमूत्र व त्या पासून जीवामृत तयार करतो. सर्व परिसरातील झाडांना रासायनिक खताचा वापर न करता शेण खत व जीवामृताचा वापर करतो. वेगवेगळ्या फुलांची बाग आहे, अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. या सर्व परीसरात नुसता फेर-फटका मारुनच मन प्रसन्न होते. शिवाय आमच्या मचाणावर बसून तुम्ही सर्व गावाचा परीसर, घरे, शेते, आमबागा आणि आमची शाळा पण न्याहाळू शकता.