ध्येय्य व उद्धीष्टे
बापर्डे पंचक्रोशीतील –
१. मुलांना प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उच्च प्रतीच्या सेवा उपलब्ध करून देणे.
२. ही मुले भवितव्यातील उत्तम नागरिक बनावीत यासाठी त्याना त्यांच्या आवडीच्या विविध शिक्षणशाखांचा (साहित्य, कला, विज्ञान, व्यापार, सैनिकी इ.) परिचय करून देऊन, त्यांना त्यासाठी ऊद्युक्त करणे.
३. शिक्षकाना त्यांच्या स्वतःच्या ज्ञान वृद्धीसाठी प्रोत्साहित करणे.
४. विद्यार्थी वर्गासोबत ग्रामस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी शक्य त्या सुविधा उपलब्ध करून देणे.
आमची जागा व इमारत
संस्थेची स्वतःची 2.5 एकर विस्तीर्ण जागा असून त्यावर 10000 चौरस फुटांची G+1 अशी दोन मजली सुसज्ज इमारत बांधलेली आहे. यांमध्ये वर्गखोल्या, हॉल, ऑफिस, प्रयोगशाळा यांचा समावेश आहे
प्रमुख आधारस्तंभ
श्री धोंडबाराव यशवंत राणे (1930-2021)
देवगड परिसरातील प्रख्यात आंबा बागायतदार व मुंबई ए पी एम सी मार्केट मधील मोठे आंबा-दलाल. देवगड व मुंबई परिसरातील कित्येक संस्थांचे ते खंदे पाठीराखे व मार्गदर्शक होते.
संस्थापक श्री अमृतराव राणे, माजी आमदार (1935-2015)
दादांनी स्थापन केलेल्या किंवा सहाय्य केलेल्या काही शिक्षण संस्था –
१) देवगड येथील शिक्षण विकास मंडळ व केळकर कॉलेज
२) किंजवडे शिक्षण प्रसारक मंडळ
३) फणसगाव शिक्षण प्रसारक मंडळ
४) साळशी शिक्षण प्रसारक मंडळ
५) खारेपाटण शिक्षण प्रसारक मंडळ
६) मोंड येथील कुलकर्णी हायस्कूल आणि शेवटी….
७) बापर्डे येथील यशवंतराव राणे हायस्कूल