चालू घडामोडी
  • शालेय मंत्रीमंडळ निवडणूक 3 जुलै 2024 रोजी निवडणूक आयोग पद्धतीने घेण्यात येणार आहे .

शालेय उपक्रम आणि स्पर्धा – २०२०-२१

सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात कोरोना महामारीमुळे, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशालेत न बोलावता ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू ठेवावा अश्या अधिसूचना शासनातर्फे सर्व प्रशाळेना मिळाल्या. त्यानुसार आमच्या प्रशाळेतील शिक्षक आणि कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये या अनुषंगाने प्रशालेचे कामकाजात आवश्यक ते बदल केले.

आमच्या ग्रामीण भागात प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन पद्धतीने पोहचता यावे यासाठी इयत्तवार विद्यार्थ्यांचे ग्रुप करून, त्यांच्या अभ्यासाचे पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात आले –

  • प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांना ग्रुप वर अभ्यास पाठविण्यात येत होता.
  • ऑनलाइन अभ्यासाच्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांना उपस्थिती दाखविणे अनिर्वाय करण्यात आले .
  • विद्यार्थ्यांना प्रशालेच्या वेळेमध्ये मधेमधे प्रत्यक्ष कॉल करून अभ्यासासंबंधी विचारणा करण्यात येत असे.
  • दरएक महिन्याने विद्यार्थ्यांना शिकवलेल्या पाठावर सराव परीक्षा शिक्षकांकडून घेण्यात आल्या.
  • आठवड्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना आलेल्या शंकांचे निरसन शिक्षकांमार्फत करण्यात येत असे.
  • अभ्यासक्रमा बाहेर, प्रशाळेमार्फत गीतगायन स्पर्धा घेण्यात आल्या. त्याला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
  • त्याचप्रमाणे प्रशाळेमार्फत हस्ताक्षर स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.

यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय | 2024 © सर्व अधिकार राखीव