बापर्डे-जुवेश्वर या आमच्या गावातील पांच मानकरी वाड्यापैकी एक घाडीवाडी ! सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बर्याच गावात वंशपरंपरेने घाडी-गुरव समाज देवाचे पुजारी म्हणून काम पाहतात. आमच्या घाडीवाडीत सध्या २०-२२ घरे आहेत, आणि त्यात ३० कुटुंब राहतात. घाडी वाडीचे स्वतंत्र असे गर्द झाडीने सजलेली राईत सुंदर, वर्तुळाकार असे फोन्डकीन देवीचे देउळ आहे. या देवळाचा जिर्णोधार १९६१ साली झाला होता.
घाडीवाडीत पूर्व आणि पाश्चिम असे दोन भाग आहेत. पैकी पाश्चिम भागात कै. विठ्ठल घाडी यांनी सुरू केलेला श्री राम नवमी उत्सव फार वर्षापासून दरवर्षी साजरा होतो. पुढच्या पिढीने श्रीरामाचे मंदिर सन १९९७/९८ साली वाडीपरीसरात बांधून, त्यात राजस्थानातून बनवून घेतलेल्या सुंदर मूर्ती बसविण्यात आल्या. या देवळाच्या उभारणी, बांधकाम आणि उत्सवाकरिता श्रीराम सेवा मंडल, मुंबईची औपचारिक स्थापना झाली. मंडळाच्या स्थापनेपासून वाडीत साजरे होणारे सर्व उत्सव, कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम सेवा मंडळामार्फत करण्यात येतात. मंडळाचे सदस्य मुंबईत एकत्र भेटून वाडीतील विविध कार्यक्रमाबाबत विचार विनिमय करतात, तसेच गावाच्या इतर मंडळांबरोबर एकत्रित भाग घेण्याबाबतही विचार होतो. नोकरीनिमित्त मुंबईत असलेले ४५-५० चाकरमानी मंडळाचे सदस्य आहेत.
श्री. नारायण भागोजी घाडी – अध्यक्ष
श्री. उमेश सीताराम घाडी – सरचिटणीस