चालू घडामोडी
  • शालेय मंत्रीमंडळ निवडणूक 3 जुलै 2024 रोजी निवडणूक आयोग पद्धतीने घेण्यात येणार आहे .

बापर्डे ग्रामपंचायत

बापर्डे गावाची माहिती

सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे जिल्हातील किनारे पर्यटन नकाशावर येत आहेत. पर्यटन नकाशावर स्थान मिळालेला समुद्र किनारा म्हणजेच देवगड तालुक्यातील अरबी समुद्राच्या खाडीकिनारी वसलेले बापर्डे गांव.

बापर्डे गाव देवगड पासून साधारण २५ किमी अंतरावर व कणकवली पासून ५५ किमी अंतर आहे. मुंबई ते गोवा राष्टीय महामार्ग क्रमांक ६६ वरून कासार्डॆ-विजयदुर्ग रस्त्यावर मुटाट या गावाच्या डाव्या बाजूला ३ किमी अंतरावर हिरवागार डोंगर व खाडीच्या कुशीत वसलेला बापर्डे हा निसर्गसंपन्न गाव आहे.

या बापर्डे गावचे दोन महसुली भाग आहेत : बापर्डे व जुवेश्वर. या दोन महसुली गावामध्ये १५ वाड्यांचा समावेश होतो. २६ऑक्टोबर १९५६ पासून बापर्डे गांवाची ग्रामपंचायत स्थापन झाली. बापर्डे गावात स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यालय, तलाटी कार्यालय, आरोग्य उपकेंद्र, सहकारी सोसायटी, रास्त दराचे धान्य दुकान, पोस्ट कार्यालय आहेत. गावात डांबरी रस्ते व पक्की पायवाट आहेत. लोकांच्या सोईप्रमाणे एस.टी. बसेसची सोय आहे.

गावची लोकसंख्या

महसुली गांव पुरुष स्त्री एकूण
बापर्डे 622 682 1304
जुवेश्वर 505 552 1057
एकूण 1127 १२३४ 2361

 

गावाचे क्षेत्र

अ.क्र   जमीन वापर   एकुण क्षेत्र = १४४३.६१.१
1 गावाचे एकूण क्षेत्र बापर्डे = ७५७.१४.४ जुवेश्वर = ६८६.४६.७
2 लागवडी योग्य क्षेत्र बापर्डे – ३८२.४९ जुवेश्वर -३४७.५२
3 कातळ क्षेत्र बापर्डे – ३०५.७३ जुवेश्वर -४१४.०१

 

सरपंच :- श्री संजय लाड
ग्रामसेवकाचे नाव :- श्री. शिवराज धारू राठोड
केंद्रचालक नांव :- श्री. सचिन मोहन नाईकधुरे
शिपाई :- श्री. प्रशांत देवळेकर
लिपिक :- श्रीम. योगिनि विश्वनाथ राणे
नळकामगार :- श्री. सरोज शाहु नाईकधुरे
ग्रामरोजगार सेवक :- श्री. विजय सहदेव मेस्त्री
ग्रामपंचायत कार्यालात दूरध्वनी क्रमांक :- ०२३६४ – २४६८२५
ग्रामपंचायत कार्यालात ई – मेल :- vpbaparde.si-mh@nic.in

 

शहरापासून अंतर –

अ.क्र शहराचे  नाव अंतर गावात येण्यासाठी सोय
1 कणकवली ५५ किमी एस.टी.बस, रिक्षा
2 देवगड २५ किमी एस.टी.बस, रिक्षा
3 वैभववाडी ५० किमी एस.टी.बस, रिक्षा

 

जवळचे रेल्वेस्टेशन – १) कणकवली – ५५ कि.मी. , २) वैभववाडी – ५० कि.मी.
जवळचे विमानतळ – १) वास्को (गोवा) २०० की.मी.
ग्रामपंचायत वार्ड ०३, ग्रामपंचायत सभासद – ०९

 

गावातील एकूण कुटुंब

एकूण घरे एकूण कुटुंबे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे दारिद्र्यरेषेवरील कुटुंबे
437 388 25 363

 

गावातील पाणी, बायोगॅस, कचराकुंडी, सौरपथदीप, शौचालय, शोषखड्डे व्यवस्था

अ.क्र एकूण संख्या
1 सार्वजनिक  विहीर 2
2 खाजगी विहीर 17
3 विंधन विहीर 7
4 खाजगी विंधन विहिर 30
5 लघु नळ पाणी योजना 1
6 बायोगास सयंत्र  संख्या 76
7 गांडूळखत प्रकल्प संख्या 3
8 कचराकुंडी 36
9 सौर पथदीप 26
10 खाजगी शौचालय 388
11 शोष खड्डे 62

 

गावातील शाळा, अंगणवाड्या

अ.क्र प्राथमिक शाळा पूर्ण प्राथमिक शाळा मिनी अंगणवाडी मोठी अंगणवाडी
1 2 2 2 3

 

शाळांची नावे – १) पुर्ण प्राथमिक शाळा बापर्डे नं ०१
२) पुर्ण प्राथमिक शाळा बापर्डे जुविवाडी
३) जि.प प्राथमिक शाळा  धुरेवाडी
४)  जि.प प्राथमिक शाळा  धंगरवाडी

 

गावातील बचत गट

अ.क्र एकुण  बचतगट दारिद्रय रेषेखालील दारिद्रय रेषेवरिल
1 33 1 32

यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय | 2024 © सर्व अधिकार राखीव