चालू घडामोडी
  • शालेय मंत्रीमंडळ निवडणूक 3 जुलै 2024 रोजी निवडणूक आयोग पद्धतीने घेण्यात येणार आहे .

मोफत आरोग्य तपासणी शिबीर (दिनांक १ व २ फेब्रुवारी २०२०)

मुंबईच्या  प्रख्यात जसलोक रुग्णालयाचे ८ निष्णात सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि ५ ईसीजी तंत्रज्ञानाच्या सहभागाने देवगड – बापर्डे येथे दिनांक १ व २ फेब्रुवारी २०२० रोजी,  यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय – बापर्डे या हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित केलेल्या वैद्यकीय तपासणी शिबिराचा ६०० ग्रामस्थांनी फायदा घेतला.

मुख्यता श्री. राजेंद्र नाईकधुरे यांच्या पुढाकाराने व डॉ. सुहास राणे यांच्या मार्गदर्शनाखाली – बापर्डे-जुवेश्वर ग्रामपंचायत, श्री देवी पावणा देवी शिक्षणसंस्था, वबापर्डे-जुवेश्वर ग्रामविकास मंडळ मुंबई, या तीन संस्थांनी हे शिबीर आयोजित केले होते.

ज्या ग्रामस्थांस मुंबईस जाऊन जसलोक हॉस्पिटल सारख्या उच्च प्रतीच्या आरोग्य सेवेचा लाभ घेणे परवडत नाही अशांसाठी पुढील तज्ज्ञांनी रुग्णांच्या गावी येऊन आपल्या सेवेचा लाभ दिला – मुंबईचे अग्रगण्य शल्यविशारद डॉ. सुरेश जोशी (हृदयरोग तज्ज्ञ) यांच्या नेतृत्वाखाली डॉ. संतोष गवळी (युरोलॉजी), डॉ. प्रवीण अग्रवाल (पोटाचे विकार), डॉ. किरण लडकत व डॉ. नितीन जयस्वाल (हाडे व सांधेदुखी तज्ज्ञ), डॉ. मनीष चोखंदरे (बालरोगतज्ज्ञ), डॉ. मीना राणे (स्त्रीरोग तज्ज्ञ व OPD), तसेच ईसीजी मध्ये सुनील, स्वप्नील, भूषण, किरण, राजेंद्र या सर्व तज्ज्ञ मंडळींचा उत्तम फायदा ग्रामस्थांना मिळाला.

या जनसेवेच्या कामासाठी आर्थिकभार सर्वश्री सुशील राणे, सुधीर धुरे, केदार लेले, विजय गुरव, अंबाजीराणे, विनोद धुरे, सुरेशराव राणे यांनी पेलला. तसेच या डॉ. मंडळींची निवास व्यवस्था श्री. बाबुराव राणे यांनी आपल्या  रामेश्वर ऍग्रोटूरिझम या निसर्गरम्य रिसॉर्ट मध्ये विनाशुल्क केली होती.

या आरोग्य तपासणी शिबीर आयोजनामागे सरपंच संजय लाड व त्यांचे सहकारी अजित राणे, संदीप नाईक धुरे, जि.प. सदस्या अनघा राणे, दिलीप अनाजीशेठ धुरे, प्रवीण राणे, विश्वास धुरे, विजय मेस्त्री, सचिन धुरे, मुटाटचे डॉ. लेले आणि मोंडचे डॉ. सचिन पोकळे, मुंबईहून सहकार्य करणारे अजय धुरे, कृष्णा फाळके, सत्यवान धुरे, प्रशांत व गिरीश धुरे, गोविंद येझरकर, सौ. सुप्रिया निकम, मनोज राणे ई. सर्वानी बरेच परिश्रम घेतले.

या शिबिराची पाहणी करण्यासाठी मुंबई जवळच्या पालघर व शिर्डी येथून त्यांचे सरपंच व सहकारी आणि ग्रामसेवक मंडळींनी खास भेट दिली होती.

यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अनिल गुरव व त्यांचे सर्व सहकारी शिक्षक, कर्मचारी, आणि शाळेतील मुले, यांनी सर्व पाहुण्यांची व रुग्णांची छान व्यवस्था आखली होती. विशेष म्हणजे या शिबीरासाठी रुग्णांची नोंदणी करणारे बापर्डेचे ग्रामसेवक शिवराज राठोडयांची त्याचदिवशी शासना तर्फे आदर्श ग्रामसेवक म्हणून घोषणा करण्यात आली.

(शब्दांकन : डॉ. सुहास राणे)

यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय | 2024 © सर्व अधिकार राखीव