चालू घडामोडी
  • शालेय मंत्रीमंडळ निवडणूक 3 जुलै 2024 रोजी निवडणूक आयोग पद्धतीने घेण्यात येणार आहे .

शालेय उपक्रम आणि स्पर्धा – 2021-22

शिक्षणाने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात बदल होतो. आणि हा व्यक्तिमत्वातील बदल विद्यार्थ्यांमध्ये करावयाचा असल्यास विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत विविध सहशालेय उपक्रमात सहभागी होणे अत्यंत आवश्यक असते. आणि हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आमच्या प्रशाळेमार्फत विविध सहशालेय उपक्रम आणि स्पर्धा आयोजित केल्या जातात. सदर उपक्रमात सर्वच विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक आणि कर्मचारी वर्ग सहभागी होतात. आणि सर्व उपक्रम आणि स्पर्धा यशस्वी करतात.

सन 2021-22 मध्ये आमच्या प्रशाळेमार्फत वर्षभर पुढील सहशालेय उपक्रम राबविण्यात आले.

1) 13 जून 2021 – प्रवेशोत्सव कार्यक्रम
सदर दिवशी नवीन शैक्षणिक वर्ष 2021-22 वर्षाची सुरुवात होत असल्याने प्रशालेमार्फत नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सव कार्क्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर दिवशी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प आणि वह्या भेट देऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

2) 21 जून 2021 – जागतिक योग दिन
आमच्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवन जगत असताना योग, ध्यानधारणा किती महत्वाची असते याची प्रचिती येण्यासाठी हा दिवस सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

3) 18 जुलै 2021 – एस एस सी विद्यार्थी गुणगौरव
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्याच्या मिळविलेल्या यशाबद्दल दरवर्षी गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात येतो. सदर दिवशी विद्यार्थ्यांना पुढील भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येतात. विविध दानशूर व्यक्ती या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव करतात.

4) 22 जुलै 2021 – गुरुपौर्णिमा
आमच्या प्रशालेत दरवर्षी मोठ्या उत्साहात गुरूपौर्णिमा कार्यक्रम खास विद्यार्थ्यांमार्फत आयोजित करण्यात येतो. सदर कार्यक्रम दिवशी सर्व विद्यार्थी आपल्या गुरूंना वंदन करून खऱ्या अर्थाने गुरुदक्षिणा देतात.

5) 1 ऑगस्ट 2023 – लोकमान्य टिळक पुण्यतिथी
आपल्या देशातील थोर क्रांतिकारक, समाजसुधारक यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी खास दरवर्षी लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

6) 15 ऑगस्ट 2021 – स्वातंत्र्य दिन व वृक्षारोपण कार्यक्रम
आमच्या प्रशालेत मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो. सदर दिवशी प्रशालेत विद्यार्थी संचालन करून ध्वजाला सलामी देतात.
सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालेत विद्यार्थी, सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्यामार्फत वृक्षारोपण करण्यात आले.

7) 5 सप्टेंबर 2021- शिक्षक दिन
दरवर्षी आमच्या प्रशालेत विद्यार्थ्यांमार्फत हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी स्वतः शिक्षक तसेच कर्मचारी बनून संपूर्ण शालेय कामकाजाचा अनुभव घेतात.

8) 5 ऑक्टोबर 2021 – सरस्वती पूजन
प्रशालेच्या अगदी स्थापनेपासुन आमच्या प्रशालेत विद्येची देवता सरस्वती मातेचे पूजन मोठ्या दिमाखात करण्यात येते. सदर दिवशी प्रशाळेमार्फत विविध स्पर्धा तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम प्रशाळेमार्फत आयोजित करण्यात येतात.

9) 16 नोव्हेंबर 2021 – बहुद्देशीय सभागृह बांधकाम भूमिपूजन
आमच्या प्रशालेच्या प्रांगणात नव्याने आमच्या संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ सुहास राणे यांच्या संकल्पनेतून नवीन बहुद्देशीय सभागृहाच्या इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला डॉ सुहास राणे यांचे मुंबईस्थित मित्रपरिवार आवर्जून उपस्थित होता.

10 ) 24 नोव्हेंबर 2021 – रक्तदान शिबीर
रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान हे लक्षात घेऊन ग्रामपंचायत बापर्डे व बापर्डे हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेत रक्तदान शिबीर चे आयोजन करण्यात आले. सदर दिवशी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले आणि आपली सामाजिक बांधिलकी जोपासली.

11) 3 फेब्रुवारी 2022 – मोटिवेशनल स्पीकर कार्यक्रम
विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीमध्ये एक पाऊल पुढे असणाऱ्या आमच्या प्रशालेने खास विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशनल स्पीकर चा कार्यक्रम आयोजित केला. त्यासाठी मोटिवेशनल स्पीकर म्हणून थोर कवी, गीतकार माननीय प्रसाद कुलकर्णी लाभले होते.

12) 27 फेब्रुवारी 2023 – मराठी राजभाषा दिन
” माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगे जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा” अगदी या उक्तीचे स्मरण विद्यार्थ्यांना नेहमी राहावे यासाठी प्रशाळेमार्फत मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रशाळेमार्फत विद्यार्थ्यांसाठी खास वेशभूषा स्पर्धा तसेच काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली.

13) 5 मार्च 2022- स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
आजचे युग हे स्पर्धात्मक योग्य आहे ही जाणीव डोळ्यासमोर ठेवून प्रशाळेमार्फत खास स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले होते. सदर मार्गदर्शनासाठी खास श्री सत्यवान रेडकर सर ( कनिष्ठ अनुवाद अधिकारी मुंबई सीमाशुल्क भारत सरकार ) प्रमुख व्यख्याते लाभले होते.

यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय | 2024 © सर्व अधिकार राखीव